नागरिकांनी सतर्क रहावे ‘सुपा’ पोलिसांचे आवाहन
मोरगावनागरिकांनी सतर्क रहावे ‘सुपा’ पोलिसांचे आवाहन
मोरगाव : स्टारयुग लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या संरक्षणासाठी सक्षम आहेत. परंतु नागरिकांनी देखील सतर्क रहावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी आज मोरगाव येथे केले.
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र आहे. पर्यटन व दर्शनासाठी येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी असलेले निवासव्यवस्था यामध्ये काही हॉटेल चालक भक्तनिवास यांची आज एक विशेष बैठक आयोजित केली.यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. मोरगाव मध्यवस्तीत सराफी दुकानावर झालेल्या चोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षेचा आढावा बैठक घेण्यात आली
मोरगाव पोलीस मदत केंद्रात झालेल्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सह पोलीस हवालदार तुषार जैनक, महिला पोलीस पाटील नयना नेवसे गावातील सर्व हॉटेल्स चालक व सराफी व्यावसायिक उपस्थित होते. सध्या विविध गुन्हेगारी बाबत उपस्थित नागरिकांना पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा बाबत माहिती देण्यात आली.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर व्हावा.
सुपर पोलीस ठाण्याच्या परिसरात उत्तम अशी गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे परंतु नागरिक याचा अपेक्षित वापर करत नसल्याचे यावेळी चर्चेत सांगण्यात आले. यापुढील काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी संदेश देण्याच्या हेतून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले.
मोरगाव साठी विशेष पोलीस गस्त सुरू
सुपे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मोरगाव सह आसपास चोरीच्या घटना समोर येत असल्याने आजपासून विशेष पोलीस गस्त सुरू करण्यात आले आहे. यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र वाहन व्यवस्था केली आहे. बारामती पुणे या प्रमुख मार्गावर होणारी गुन्हेगारी टाळण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. : स्टार युग लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या संरक्षणासाठी सक्षम आहेत. परंतु नागरिकांनी देखील सतर्क रहावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी आज मोरगाव येथे केले.
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र आहे. पर्यटन व दर्शनासाठी येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी असलेले निवासव्यवस्था यामध्ये काही हॉटेल चालक भक्तनिवास यांची आज एक विशेष बैठक आयोजित केली.यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. मोरगाव मध्यवस्तीत सराफी दुकानावर झालेल्या चोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षेचा आढावा बैठक घेण्यात आली
मोरगाव पोलीस मदत केंद्रात झालेल्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सह पोलीस हवालदार तुषार जैनक, महिला पोलीस पाटील नयना नेवसे गावातील सर्व हॉटेल्स चालक व सराफी व्यावसायिक उपस्थित होते. सध्या विविध गुन्हेगारी बाबत उपस्थित नागरिकांना पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा बाबत माहिती देण्यात आली.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर व्हावा.
सुपर पोलीस ठाण्याच्या परिसरात उत्तम अशी गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे परंतु नागरिक याचा अपेक्षित वापर करत नसल्याचे यावेळी चर्चेत सांगण्यात आले. यापुढील काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी संदेश देण्याच्या हेतून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले.
मोरगाव साठी विशेष पोलीस गस्त सुरू
सुपे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मोरगाव सह आसपास चोरीच्या घटना समोर येत असल्याने आजपासून विशेष पोलीस गस्त सुरू करण्यात आले आहे. यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र वाहन व्यवस्था केली आहे. बारामती पुणे या प्रमुख मार्गावर होणारी गुन्हेगारी टाळण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.