मोरगावात परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करत सुपा पोलिसांची अवैद्य दारू व्यावसायिकांवर मोठी कारवाई, पोलिसांच्या कारवाईचे परिसरातून कौतुक

Staryug.live

मोरगाव परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक प्रहार,
एकाच वेळी पाच ठिकाणी छापेमारी; सुपा पोलिसांचा अवैध व्यवसायिकांना दणका, धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरात अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी सुपा पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोरगाव परिसरात अवैध दारू विक्री वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आणि महिला वर्गाकडून सातत्याने करण्यात येत होत्या. विशेषतः ग्रामीण भागातील युवक आणि कुटुंबांवर या अवैध दारू विक्रीचे विपरीत परिणाम होत असल्याने पोलिस प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सुपा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोरगाव व परिसरातील पाच संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांची मोठी धांदल उडाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा, विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या.कारवाईदरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्या अवैध व्यवहारांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

सुपा पोलिसांनी केलेल्या या मोहिमेमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडे राज्यात घडलेल्या विषारी दारू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मोरगाव परिसरातही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. त्यामुळे पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईचे ग्रामस्थ, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्टार युग लाईव्ह शी बोलताना सांगितले की नागरिकांच्या तक्रारी आल्या नंतर कोणत्याही अवैध्य व्यवसायिकाची गाय केली जाणार नाही पोलिसांमार्फत कठरात कठोर कारवाई केली जाईल. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत, अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होईपर्यंत अशाच धडक मोहिमा राबविण्याची मागणी केली आहे. सुपा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोरगाव परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
To Top