नॅशनल लेवल अबॅक्स स्पर्धेत एस. जी. अबॅक्स अँड वेदिक मॅथ्स, मोरगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
१५ चॅम्पियन, ११ प्रथम, ९ द्वितीय तर १५ विद्यार्थ्यांनी पटकावला तृतीय क्रमांक.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
शिरूर येथे शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अॅपेक्स स्पर्धेत एस. जी. अॅपेक्स अँड वैदिक मॅथ्स, मोरगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत मोरगाव, शिरूर, कोंढार व न्हावरा परिसरातील सुमारे २४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शिरूर येथील अॅपेक्स अकॅडमीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एस. जी. अॅपेक्स अँड वैदिक मॅथ्स, मोरगावच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मोरगाव व चांदगुडेवाडी, राजे प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच विद्याप्रतिष्ठान इंग्रजी माध्यम, सुपे आणि मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव या शाळांमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या निकालात मोरगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १५ चॅम्पियन, ११ प्रथम क्रमांक, ९ द्वितीय क्रमांक आणि १५ तृतीय क्रमांक पटकावले. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना एस. जी. अॅपेक्स अँड वैदिक मॅथ्स, मोरगावचे संचालक श्री. विरेंद्र आगाशे सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा देत त्यांना स्पर्धेची तयारी करून देण्यात आली. त्यामुळेच मोरगावच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास शिरूर नगरपालिकेचे अध्यक्ष, विविध मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच संबंधित शाळांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात आले.
मोरगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे परिसरातील पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
