बारामती सह पुरंदर तालुक्यात घडलेले माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे चिंकारा हरीण शिकार हे प्रकरण सर्वांना ज्ञात आहे. यावेळी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेऊन राज्य मंत्र्यांना जेल दाखवणारे सेवानिवृत्त वनाधिकारी सध्या स्वतःलाच न्याय मिळत नसल्याने त्रस्त आहेत.
सध्या सोलापूर शहरात वास्तव्याला असलेले मारुती बाळाप्पा बोकडे हे वनविभागातील सेवानिवृत्त अधिकारी सर्वांना परिचित आहेत. शासनाच्या नोकरीत असताना त्यांनी माणसांनाच काय ? परंतु प्राण्यांनाही न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सेवानिवृत्तीनंतर सध्या आनंद मिळण्याऐवजी दुःखच त्यांच्या वाट्याला आले. नातेवाईक नाहक त्रास देऊन छळ करत असल्याचा हे आरोप करतात.
सोलापूर पोलीस प्रशासनातील काही पोलिस अधिकारी व कर्मचारी आर्थिक लाभापोटी मला न्याय देत नसल्याचे त्यांनी सांगितले. नातेवाईकांकडून वारंवार मारहाण होत असून याची गंभीर दखल घ्या अशी मागणी आहे. कारवाईच्या मागणीसाठी गेल्यानंतर न्याय मिळण्याऐवजी अन्याय होत असल्याचे ते सांगतात.
बारामती तालुक्यात नोकरीत असताना यांनी अनेकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर थेट राज्यमंत्र्यालाही राजीनामा देऊन जेलची हवा दाखवणारा अधिकारी आज स्वतःच्या न्यायासाठी याचना करत आहे. प्रशासनाने दखल घ्यावी अशीच मागणी समोर आली आहे.
