बारामतीच्या आठ गावांना पाणी पाणी करण्याची वेळ
---------------------------
तब्बल 40 कोटींची योजना काम रखडले !
स्टारयुग लाईव्ह :मोरगाव
बारामतीच्या ग्रामीण भागात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे पिण्याचे पाणी प्रश्न गंभीर झालाय.मुर्टी-मोढवे येथे आठ गावांना संजीवन ठरणार अशी पिण्याच्या पाण्याची योजन आर्थिक निधी नसल्याने बंद पडून आहे. या कामासाठी राज्य सरकारने दखल घ्यावी अशी मागणी समोर येऊ लागलीय.
गेल्या अनेक वर्ष बारामतीच्या पश्चिम भागात काही गावांना शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तब्बल आठ गावांना या प्रस्तावित योजनेतून हक्काचे आणि कायम पाणी मिळणार अशी ग्रामस्थांची भावना आहे. सध्या या सर्व गावांना पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने बहुतांश लाईन टाकण्याचे काम झाले आहे. काही ठिकाणी अपूर्ण काम जैसे थे स्थितीतच पडून आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
मोढवे गावचे हद्दीत योजनेतून जागा संपादन व आवश्यक असलेले वास्तु उभारणीचे काम पूर्ण झाल्याचे दिसते. योजना चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत लाईट पुरवठा येथे सुरू आहे. दोन भव्य जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दोन टप्प्यात ही योजना करण्याचे प्रस्तावित आहे. यातील पहिल्या टप्प्यात सुमारे 27 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 13 कोटी रुपये खर्च अशी शासनाची योजना आहे.
सध्या योजनेत समाविष्ट असलेल्या मोराळवाडी, मुर्टी, मोढवे गावांना प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू केला आहे. या गावातील तात्पुरता प्रश्न सुटला तरी ? अन्य गावांच्या मात्र प्रश्न जैसे थे पडुन आहे. संपूर्ण गावांना सुरळीत पाणी पुरवण्यासाठी तीन लाख तीस हजार लिटर पाणी साठवणूक क्षमतेचे दोन जलकुंभ येथे तयार करण्यात आले आहेत.
वीज वितरण कंपनीची 46 लाख रुपये थकबाकी ! भरणार कोण ?
पाणी पुरवठा योजनेचे कामकाज सुरू झाल्यापासून सद्यस्थितीत विद्युत वितरण कंपनीचे वीज वापर बिलापोटी सुमारे 46 लाख रुपये विज बिल भरणे बाकी आहे. मोढवे व करंजे ग्रामपंचायतीच्या नावावर या बिलांची रक्कम वितरण कंपनीकडे थकबाकी पोटी दिसतात. त्यामुळे भविष्य काळात योजना चालवताना अनेक बाबींचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. वीज वितरण कंपनीला देणे असलेली रक्कम कोणत्या निधीतून भरली जाणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
*महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे कानावर हात* ?
शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केलेली योजना आजही हस्तांतरण केली नाही. बहुतांश कामे अपूर्ण आहेत. योजना कायमस्वरूपी चालवण्यासाठी शिखर समितीची स्थापना केली आहे परंतु संपूर्ण भविष्यातील व्यवस्थापना बाबत धोरण निश्चित करण्यात आले नाही. अशा विविध प्रश्नांची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र आचारसंहितेचे कारण सांगून याविषयी सविस्तर वस्तूस्थिती ची माहिती देणे टाळण्यात आले.
तालुक्याच्या ग्रामीण भागात आठ गावांना महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या पाणी योजनेच्या सध्या असलेल्या अडचणींबाबत माहिती घेण्यासाठी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे यातील अडचणी व भविष्यात उपयोजना याबाबत माहिती मिळाली नाही.
योजना हस्तांतरण नसल्याने सर्व प्रश्न उपस्थित
गेली अनेक दिवसांपासून योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम पूर्ण करताना होणारा विलंब व याच दरम्यान वाढत गेलेल्या आर्थिक बजेट त्यामुळे योजना अडचणीत आली का असं सवाल या परिसरातील लाभार्थी गावातून उपस्थित होत आहे. मूळ योजनेतील अंदाज पत्रक वाढलेली अतिरिक्त कामे आर्थिक निधीची टंचाई समोर आली
