मोरगावात हरणाच्या पडसाला कुत्र्याच्या तावडीतून जीवदान

Staryug.live
मोरगाव येथे हरणाच्या पडसाला जीवदान
              सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार 

मोरगाव :  स्टारयुग लाईव्ह 

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पिराचा मळा येथे आज सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागृतीमुळे हरणाच्या पडसाला जीवदान मिळाले. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून चिंकारा जातीचे एक पाडस सुखरूप बचावले. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
       मोरगाव येथे उसाच्या शेताजवळ काही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीचे हरीण सैरावैरा पडत होते. नुकत्याच जन्मलेल्या या पाठशाला सकाळी काही मोकाट कुत्र्यांनी घेरले. यापूर्वी देखील कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा हरी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज मात्र ज्या ग्रुप वन्यप्रेमी मुळे या पाडसाचे संरक्षण झाले. 
         मोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य छगन काळु नेवसे तसेच नवनाथ उर्फ नाना नेवसे यांनी या कुत्र्याच्या हल्ल्यातून हरणाचे पाडसाची सुटका केली. यानंतर बारामती वनपरिक्षेत्र विभागाला ही माहिती देण्यात आली. वनविभागाचे गोरख भापकर सह गणपत भोंडवे व दिवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन चिंकाराचे पाडस ताब्यात घेतले. 
     सध्या वाढत्या उन्हाची तीव्रता तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे वन्यप्राणी लोकोस्तीकडे वावर वाढला आहे. बारामती वनपरिक्षेत्र विभागाने या प्राण्यांच्या संरक्षणासाठी पाण्याची टॅंक निर्माण करावी अशी मागणी आहे.
To Top