मोरगावत सराफी दुकान फोडले चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थ मध्ये भीतीचे वातावरण गस्त घालण्याची मागणी.

Staryug.live

मोरगाव परिसरात सराफी दुकान फोडले; चोरट्यांचा धुमाकूळ.

मोरगाव  : स्टारयुग लाईव्ह.

 मोरगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकान फोडून किरकोळ प्रमाणात चांदीचे दागिने लामपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरगाव ग्रामपंचायत मार्गावरील तुळजाभवानी ज्वेलर्स या ठिकाणी मध्यरात्रीच्या 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व दुकानातील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली. यावेळी गावचे रखवाली करणाऱ्या गोरखाने जाब विचारला असता चोरट्यांनी त्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांनी पलायन केले. त्याआधी अकरा वाजण्याच्या सुमारास ढोले मळ्यातील काही ग्रामस्थांना चोरटे दिसल्याची माहिती समोर आली होती.

 सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पंचनामा करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
To Top