मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावी निकाल 95.83%

Staryug.live
मोरगावच्या श्री मयुरेश्वर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.८३ टक्के

स्टारयुग लाईव : मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदा ९५.८३ टक्के लागला असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले. यामध्ये स्वरांजली रवींद्र तावरे 94.20% मिळून प्रथम तर राजेश सुनील साळवे हा विद्यार्थी ९१. ४० टक्के गुण मिळवून दुसरा तसेच ज्ञानेश्वरी विलास कापरे 91 टक्के मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले असून अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यही संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालय प्रशासनाने दिली.
मुख्याध्यापकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी वर्षभर नियमित अभ्यास, सराव परीक्षा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यामुळे विद्यालयाचा निकाल उल्लेखनीय लागला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी याच मेहनतीच्या जोरावर उच्च शिक्षणात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे व पर्यवेक्षिका मंदाकिनी शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मोरगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To Top