मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Staryug.live


मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक ईश्वरी अजित देवकाते (आनंदी योगिनी योगा क्लास, हडपसर) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाचे आरोग्यदायी महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यास केला.योगामुळे शरीर व मन निरोगी राहते, एकाग्रता वाढते तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता निर्माण होते, असे मार्गदर्शन ईश्वरी देवकाते यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण झाली व संपूर्ण परिसर उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला. विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री अर्जुन कोकरे सर यांनी योग प्रशिक्षक यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले.. श्री प्रवीण आटोळे यांनी त्यांचा परिचय दिला.. व सो सारिका तांबे यांनी त्यांच्या आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. 
To Top