नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर फुगे, फुलांची सजावट व स्वागत फलक लावून विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले.
यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प व खाऊ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी आणि शाळेविषयी आत्मीयता वाढावी यासाठी विविध स्वागतपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्याप श्री अर्जुन कोकरे व पर्यवेक्षिका सौ मंदाकिनी शिंदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, शिस्त, स्वच्छता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री पोपट तात्या तावरे ग्रामपंचायत सदस्य अक्षय तावरे माजी उपसरपंच निलेश केदारी तंटामुक्ती अध्यक्ष श्री पप्पू तावरे व पत्रकार श्री अशोक वेदपाठक व मनोहर तावरे उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण आटोळे यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. याप्रसंगी केंद्रप्रमुख रवींद्र तावरे व ज्येष्ठ शिक्षक विजय हाडके उपस्थित होते.
