मोढवे येथे बांधकाम कामगारांना प्रशिक्षण पूर्णत्व प्रमाणपत्रांचे वितरण.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील मोडवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सुमारे 34 बांधकाम कामगारांना प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या प्रशिक्षणाद्वारे कामगारांना बांधकाम क्षेत्रातील सुरक्षित कामकाज, आवश्यक कौशल्ये, शासकीय योजनांची माहिती तसेच कामगारांच्या हक्क व कर्तव्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षित कामगारांचे अभिनंदन करत कौशल्यविकासामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास संबंधित विभागाचे अधिकारी, प्रशिक्षक, स्थानिक मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले.
