ई पाहणी नोंदणी ॲप बंद. शेतकऱ्यांची गैरसोय

Staryug.live

ई पाहणी नोंदणी ॲप बंद. शेतकऱ्यांची गैरसोय

स्टार युग लाईव्ह :  मोरगाव 

राज्यात खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोहिमेला सुरुवात झाली असली तरी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्व शेतकऱ्यांना पीक नोंदणी करता येत नसल्याची तक्रार  मोरगाव येथील श्री केशव तावरे यांनी केली आहे.

ॲप सुरू न होणे, लॉगिन होत नसणे, सर्व्हर डाऊन असणे, माहिती भरल्यानंतर ती सेव्ह न होणे अशा समस्यांमुळे शेतकरी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले .
ई-पीक पाहणी ही पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील मदत तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, यंदापासून राज्य शासनाने १५ जुलै २०२६ पासून नियुक्त सहाय्यकांमार्फत प्रत्यक्ष शेतात जाऊन ई-पीक पाहणी करण्याची व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, अनेक भागांत ॲपमधील तांत्रिक अडचणी कायम असल्याने नोंदणीच्या कामाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

 प्रशासन आणि महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक दोष तातडीने दूर करून सर्व्हर क्षमता वाढवावी, तसेच आवश्यक असल्यास नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ द्यावा, अशी मागणीसर्व शेतकऱ्यांच्या वतीने श्री केशव तावरे  यांनी केलेली आहे.
To Top