जेजुरी–मोरगाव बससेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासापुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम (ढोले) यांच्या पाठपुराव्याला यश.

Staryug.live


जेजुरी–मोरगाव बससेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम (ढोले) यांच्या पाठपुराव्याला यश.

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

 काही दिवसांपासून अपरिहार्य कारणास्तव बंद असलेली जेजुरी–मोरगाव सार्वजनिक बससेवा अखेर पूर्ववत सुरू करण्यात आली असून, यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदन सादर करून प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीकडे लक्ष वेधले. यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चेतून जेजुरी–मोरगाव बससेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे जेजुरी–मोरगाव परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बससेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांचे जेजुरी–मोरगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस तथा रोहिणीताई युवामंच,  मोरगावचे  महेश दादा जाधव यांनीही बससेवा पूर्ववत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित प्रशासनाचे आभार मानले.

To Top