हनुमंतराव भापकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बारामती तालुकाप्रमुखपदी नियुक्तीपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती; बारामती तालुक्यात संघटन बळकट करण्यावर भर

Staryug.live


हनुमंतराव भापकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बारामती तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती; बारामती तालुक्यात संघटन बळकट करण्यावर भर

स्टारयुग लाईव :  मोरगाव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हनुमंतराव हेमीराव भापकर यांची बारामती तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे बारामती तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हनुमंतराव भापकर यांनी यापूर्वीही पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, शेतकरी, युवक आणि सामाजिक घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सक्रिय कार्यपद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे तालुक्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

बारामती तालुक्यात शिवसेनेचा विचार अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, ही जबाबदारी भापकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

भापकर यांच्या पुनर्नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक सक्षम होईल, तसेच विरोधकांपुढे प्रभावी पर्याय उभा राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जनतेचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करण्यावर आपण प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, हनुमंतराव भापकर यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
To Top