मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरास डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

Staryug.live

मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरास डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

अष्टविनायक विकास आराखड्यातील कामांचा घेतला आढावा; भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक सूचना

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव 

 विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम ताई गोरे यांनी आज मोरगाव येथील श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिरास भेट देऊन श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याअंतर्गत मोरगाव येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली.
मोरगाव हे अष्टविनायक तीर्थक्षेत्रातील आद्य क्षेत्र असल्याने येथे राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग, दर्शन व्यवस्था, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत डॉ. गोरे यांनी संबंधित अधिकारी व व्यवस्थापनाकडून माहिती घेतली.
अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता आणि त्याचा भाविकांना प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा अधिक सुलभ व प्रभावी करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून कामांच्या प्रगतीबाबतही त्यांनी माहिती घेतली. भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत तीर्थक्षेत्राचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचे डॉ. नीलम गोरे यांनी नमूद केले.
यावेळी श्री मयुरेश्वर मंदिर ट्रस्ट व्यवस्थापक श्री राजेंद्र जगताप यांनी नीलम ताई गोऱ्हे यांचा शाल श्रीफळ व श्री मयुरेश्वर प्रतिमा देऊन सन्मान केला.पदाधिकारी, अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
To Top