हनुमंत चांदगुडे यांचा'आडतास' कवितासंग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात.

Staryug.live
हनुमंत चांदगुडे यांचा
'आडतास' कवितासंग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात.

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव 

बारामती सुपे येथील सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे लिखित 'आडतास' या  काव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या या काव्यसंग्रहातील "लेक"  कवितेच्या समावेश याआधी  एफ वाय बी ए साठी झालेला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमातील 'साहित्यनिर्मिती प्रक्रिया, साहित्यनिर्मितीचे सिद्धांतव्यवहार आणि स्वरूप' या अभ्यासघटकासाठी 'आडतास' काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. 
   हनुमंत चांदगुडे यांची याआधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजेच बालभारतीच्या पुस्तकात इयत्ता 'आठवी' च्या वर्गासाठी 'आळाशी' कविता अभ्यासक्रमात आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'किणकीण घुंगुराची' ही कविता आहे. शेती माती निसर्गाचे व अवतीभवतीच्या भवतालाचे वास्तव सांगणारे प्रभावी चित्रण   चांदगुडे नेहमीच आपल्या लेखणीतून मांडत असतात. खासकरून शेतकरी, कष्टकरी, दबल्या पिचलेल्या सामान्य माणसांचा, उपेक्षितांचा आवाज त्यांच्या लोकलयीच्या कवितेमधून प्रभावीत  करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 
     अनेक चित्रपट, मालिका वेबसिरीजसाठी गीतलेखन करणाऱ्या चांदगुडे यांना या  यशाबद्दल विचारले असता बोलताना म्हणाले की, याआधीही माझ्या कविता अभ्यासक्रमात आहेत परंतू आता पुर्ण पुस्तक अभ्यासक्रमात येत आहे याचा आनंद मोठा आहे. या कवितासंग्रहाचा कवी मी असलो तरी हा सन्मान माझ्या भागातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य माणसांचा व त्यांच्या लोकलयीतील भाषेचा सन्मान आहे.हनुमंत चांदगुडे यांचा
'आडतास' कवितासंग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात.
..
बारामती सुपे येथील सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे लिखित 'आडतास' या  काव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या या काव्यसंग्रहातील "लेक"  कवितेच्या समावेश याआधी  एफ वाय बी ए साठी झालेला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमातील 'साहित्यनिर्मिती प्रक्रिया, साहित्यनिर्मितीचे सिद्धांतव्यवहार आणि स्वरूप' या अभ्यासघटकासाठी 'आडतास' काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. 
   हनुमंत चांदगुडे यांची याआधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजेच बालभारतीच्या पुस्तकात इयत्ता 'आठवी' च्या वर्गासाठी 'आळाशी' कविता अभ्यासक्रमात आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'किणकीण घुंगुराची' ही कविता आहे. शेती माती निसर्गाचे व अवतीभवतीच्या भवतालाचे वास्तव सांगणारे प्रभावी चित्रण   चांदगुडे नेहमीच आपल्या लेखणीतून मांडत असतात. खासकरून शेतकरी, कष्टकरी, दबल्या पिचलेल्या सामान्य माणसांचा, उपेक्षितांचा आवाज त्यांच्या लोकलयीच्या कवितेमधून प्रभावीत  करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 
     
अनेक चित्रपट, मालिका वेबसिरीजसाठी गीतलेखन करणाऱ्या चांदगुडे यांना या  यशाबद्दल विचारले असता बोलताना म्हणाले की, याआधीही माझ्या कविता अभ्यासक्रमात आहेत परंतू आता पुर्ण पुस्तक अभ्यासक्रमात येत आहे याचा आनंद मोठा आहे. या कवितासंग्रहाचा कवी मी असलो तरी हा सन्मान माझ्या भागातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य माणसांचा व त्यांच्या लोकलयीतील भाषेचा सन्मान आहे.
To Top