कोल्ड्रिंक पाजण्याच्या बहाण्याने अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध

Staryug.live

कोल्ड्रिंक पाजण्याच्या बहाण्याने अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध

स्टारयुग लाईव्ह : बारामती

माहेरच्या यात्रेसाठी गेलेल्या विवाहित महिलेचा गैरफायदा घेत कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेच्या सासरी जाऊनही आरोपीने वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद माळेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अभिषेक मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एम), ३५१(१), ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता माहेरच्या यात्रेसाठी गेली असताना भावकीतील आरोपी अभिषेक जगताप याने तिला कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने आपल्या जवळ बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याच्याकडे असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
धमकीमुळे पीडिता घाबरल्याचा आरोप असून, त्यानंतर आरोपीने पीडितेच्या सासरी राहत्या घरी येऊन वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार २९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते त्यानंतरच्या कालावधीत, तसेच तक्रारीत नमूद केलेल्या कालावधीदरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची नेमकी तारीख व वेळ पीडितेला आठवत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाची नोंद माळेगाव पोलीस ठाण्यात नोंद क्र. ४७/२०२६, रात्री ९.३३ वाजता करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस नाईक सानप (ब. नं. ७५८) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीकडील कथित व्हिडीओ तसेच इतर संबंधित बाबींचीही चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

To Top