मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज, शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर परिसरातील पाठीमागील भागात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्काच्या माध्यमातून नागरिकांशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे.
या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच बारामती तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये सौ. वैशाली ताई नागवडे (अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), श्री. विश्वजाल बाबासाहेब जगताप (अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे), श्री. संजीव नाना होळकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा), श्री. पुरुषोत्तम दादा जगताप (चेअरमन, सोमेश्वर सह. साखर कारखाना), तसेच श्री. किरण दादा तावरे, श्री. संदीप तात्या तावडे, श्री. विजयास नाना देवकाते आणि सौ. अलकाताई पोपट तावरे आदी मान्यवरांचा समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्यास बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या, विविध विकासकामे, शासकीय योजना तसेच स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधण्यास मदत होणार असून, पक्षाच्या संघटनात्मक कार्यालाही अधिक बळ मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक सौ. रोहिणीताई संदीप कदम (ढोले), सदस्य, पुणे जिल्हा परिषद, पुणे असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. रोहिणीताई युवा मंच, समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र मोरगाव यांच्या सहकार्याने हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
