श्री मयुरेश्वर विद्यालयात बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

Staryug.live

श्री मयुरेश्वर विद्यालयात बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

स्टारयुग लाईव्ह:  मोरगाव 

 कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित बालचित्रकला स्पर्धा २०२६ श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या स्पर्धेत गट क्रमांक ३ व गट क्रमांक ४ मधून विद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला व कलागुणांना वाव देत विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली.

स्पर्धेचे संपूर्ण कामकाज विद्यालयाचे कला विभाग प्रमुख श्री. ज्ञानेश्वर राऊत यांनी पाहिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अशी माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख सौ. सारिका तांबे यांनी दिली.
To Top