बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी युवराज खोमणे तर कार्याध्यक्षपदी राजेश वाघ यांची निवड

Staryug.live
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युवराज खोमणे,
 कार्याध्यक्षपदी राजेश वाघ यांची निवड

मोरगाव : स्टारयुग लाईव्ह

 बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्य करण्याची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी युवराज खोमणे, कार्याध्यक्ष राजेश वाघ, उपाध्यक्षपदी कल्याण पाचांगणे, सुनील जाधव, सचिव गजानन हगवणे, सहसचिव चिंतामणी क्षीरसागर, खजिनदार विजय गोलांडे तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष महेश जगताप यांची निवड करण्यात आली. तसेच पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, दत्ता माळशिकारे व जयराम सुपेकर यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. 

      मोरगाव ता. बारामती येथे निसर्ग संगीत पर्यटन केंद्र याठिकाणी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण  सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे होते. पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष adv. गणेश आळंदीकर यांनी नवीन कार्यकारणीच्या निवडी जाहीर  केली.
    
     बैठकीला जेष्ठ पत्रकार रामभाऊ जगताप, संतोष शेंडकर, मनोहर तावरे,दिपक जाधव, गजानन हगवणे, संगिता भापकर, विजय गोलांडे, विनोद पवार, चिंतामणी क्षीरसागर, सोमनाथ भिले, गोरख जाधव, सचिन पवार,सुनील जाधव, संतोष भोसले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. 
   
     तरडोली येथील  पत्रकार   संगीता भापकर यांची कन्या अबोली हनुमंत भापकर हिने लेखापरीक्षक परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याने तिचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. तसेच राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पत्रकार संघाचे सदस्य विजय मोरे यांचे वडिलांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.



To Top