ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला घातले कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे साकडे

Staryug.live
पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूक करण्याचे साकडे घातले. या भेटीमुळे भविष्यात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा प्रश्न आता मोकळा झाला आहे.

पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच संघटनेचे संस्थापक सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे व जिल्हाध्यक्ष गणेश वाळुंजकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ डाळिंबकर, धनसिंग जाधव, राजेंद्र वावळ, वसंत शिंदे, मारुती यादव, शशिकांत सदाफुले, सागर भोसले, संतोष साखरे, संतोष तुपे, विलास मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी चर्चा करून साकडे घातले.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ वर्गाचे वेतन श्रेणी लागू करावी, 23 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता त्वरित वितरित करावा, सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी, सेवा बजावत असताना मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, कर्मचाऱ्यांना किमान 15 लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, शंभर टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबवावी, 2024 च्या जनगणनेनुसार आकृतीबंधात वाढ करावी, नियमित वेतन व राहणीमान भत्ता मिळावा आधी मागण्या ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिव्हाळ्याचे सर्व प्रलंबित प्रश्न स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सोडवण्यात येईल अशा आश्वासन नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी शिष्टमंडळास दिले.
To Top