बारामतीच्या 'जोगवडी' गावात घरगुती वादातून एका तरुणाची हत्या
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील जोगवडी या गावतुन आज धक्कादायक माहिती समोर आलीय.घरगुती वादातून एका तरुणाची हत्या करण्यात झाली असल्याच सांगण्यात आले. कुटुंबातील सावत्र आई वडील व भाऊ यांनी संगनमताने हे कृत्य केल्याची पोलिसात फिर्याद दाखल आहे.
वडगाव- निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे जोगवडी गावात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली. येथील सुरज संजय गुळमकर (वय- ३० वर्ष) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रथम दर्शनी पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
रात्री उशिरा घटनास्थळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड भेट देऊन माहिती घेतली. घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करत आहेत.
