बारामती शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांचा राष्ट्रवादीतून पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश.

Staryug.live

बारामती शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांचा राष्ट्रवादीतून पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश.

स्टारयुग लाईव्ह   :  मोरगाव

बारामती तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी 2011 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिरायत भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता मात्र, जिरायत भागात अपेक्षित कामे न झाल्यामुळे हनुमंत भापकर यांनी नाराज होऊन पुन्हा स्वगृही शिवसेनेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा फडकवत प्रवेश केला. 

बारामतीचे तालुकाप्रमुख म्हणून यापूर्वी आठ वर्षे सलग काम केले आहे. तर विविध पदांवर १७ वर्ष काम केले आहे स्वगृही आल्याचा आनंद असून कामासाठी उत्साह वाढल्याचे भापकर यांनी सांगितले. बारामती तालुक्याच्या जिरायत भागांमध्ये शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नाझरे धरणाची उंची ,खोली वाढवावी व रुंदीकरण करावे या मागण्यासाठी पाच जून २०११ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा  यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता .त्यांनी या सर्व मागण्या मान्य करून लवकरात लवकरच जिरायत भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवा असे अभिवचन दिले होते. 

परंतु थोड्या प्रमाणात पुरंदर उपसा सिंचन योजनेची डागडुजी झाली झाली याव्यतिरिक्त कोणतेही काम तडीस गेले नाही आज ही कऱ्हा नीरा जोड प्रकल्प उपसा सिंचन योजना ही १००० कोटींची योजना शासनाने मंजूर केली असली तरी २२ गावातील शेतकऱ्यांची जिराईत भाग पाणी परीषदेची मागणी पाणी परीषेदेचा अध्यक्ष असल्याने कऱ्हा निरा नदी जोड प्रकल्प असून त्यातून बारमाही पाणी मिळावे अशी आहे. 

शासनाने मंजूर केलेल्या कऱ्हा निरा जोड प्रकल्प बारामतीच्या जिरायत भागात येणार असला तरी  ते बंद पाईप लाईन ने ज्या गावांसाठी आहे त्यांनाच भेटणार आहे. वर्षातुन १०० दिवस पावसाळ्यात गरज नसेल त्या वेळी फक्त ठेकेदार कंपनी सांभाळण्यासाठी आहे .जशी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची परिस्थिती आहे. तसेच  म्हणजे ६ व्या टप्यात बारामती जिराईत भागाचा समावेश आहे .५ टप्प्यातील शेतीसिंचन झाल्यावर बारामतीला पाणी भेटते त्यामुळे हाताशी आलेली पिके जळुन जातात .

अजित दादांच्या नंतर पक्षात समन्वय राहीलेला नाही . तसेच दादांच्या विमान अपघाताची चौकशी केली नाही बारामतीत दादांच्या अपघाताची पोलीस खात्याने तक्रार नोंदवून घेतली नाही त्या मुळे रंजल्या गांजले यांच्यासाठी न्याय देण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय देणार तसेच ज्या पक्षात माझा राजकीय जन्म शिवसेनेत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आहे  संविधानाला मानुन काम करता येईल  व तालुक्यात चालू असलेली दडपशाहीस आळा घालण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आज मी निर्णय घेतला आहे असे भापकर यांनी सांगितले.

पोलीस, महसुल, कृषी, पाटबंधारे विभाग ,सार्वजनिक बांधकाम,  पंचायत समिती, घरकुल, शौचालय योजना इत्यादी खात्यात मनमानी आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असुन गोरगरीब व दुर्बल लाभार्थी यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार असल्याचे भापकर यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते भगवा  झेंडा हातात देऊन शिवबंधन बांधून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस साक्षी ठेवून भापकर यांचा प्रवेश शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. यावेळी खासदार शिवसेना नेते संजय राऊत, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, जिल्हाप्रमुख संजय काळे, बारामती विधानसभा संपर्कप्रमुख आदिनाथ कोठाडीया व पुणे जिल्ह्यातील निष्ठावंत असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

५ वर्ष वीज महावितरण समितीवरकाम  पुणे जिल्हा ६ वर्ष जिल्हा परिषद स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य जलव्यवस्थापन समिती सदस्य म्हणून काम पक्ष निरीक्षक दुष्काळ निवारण समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये काम केल्याचा अनुभव त्याचा फायदा सर्वसामान्य करून देऊ सर्व आजी माजी पदाधिकारी यांचा समन्वय साधून बारामती विधान सभेवर  भगवा फडकवणयासाठी प्रयत्न करणार आहे
To Top