मोरगाव येथील संत बाळूमामा मंदिराच्या बांधकामासाठी निधीची मागणी; युगेंद्रदादा पवार यांचे भरघोस मदतीचे आश्वासन.

Staryug.live


मोरगाव येथील संत बाळूमामा मंदिराच्या बांधकामासाठी निधीची मागणी; युगेंद्रदादा पवार यांचे भरघोस मदतीचे आश्वासन.

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव 

: बारामती तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोरगाव येथील संत बाळूमामा मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने संत बाळूमामा मंदिर देवालय समिती, मोरगाव व पालवे मंडळींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्रदादा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाने मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची माहिती देत उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मंदिराच्या विकासासाठी येणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

युगेंद्रदादा पवार यांनी शिष्टमंडळाकडून मंदिराच्या बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक निधी आणि भविष्यातील विकास आराखडा याची माहिती जाणून घेतली. संत बाळूमामा हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिराचे काम दर्जेदार व लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी लवकरच संत बाळूमामा मंदिराला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. तसेच मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी आवश्यक ते सहकार्य करत भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
युगेंद्रदादा पवार यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मंदिर समिती व पालवे मंडळींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिराचे उर्वरित बांधकाम लवकर पूर्ण होण्याबाबत आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीमुळे संत बाळूमामा मंदिराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
To Top