बारामतीचे सुपुत्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त मोरगावात प्रतिमापूजन व स्वच्छता अभियान.

Staryug.live

बारामतीचे सुपुत्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त मोरगावात प्रतिमापूजन व स्वच्छता अभियान.

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

बारामतीचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त मोरगाव (ता. बारामती) ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रतिमापूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धापूर्वक पार पडला. यावेळी उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केला.
यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसराची स्वच्छता करून स्वच्छ आणि सुंदर गावाचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमाला वडगाव निंबाळकर-मोरगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणीताई संदीप कदम-ढोले, बारामती पंचायत समितीच्या माजी सभापती अमृता गारडे, मोरगावचे माजी सरपंच पोपटराव तावरे, माजी सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच भारतीताई गायकवाड, विद्यमान उपसरपंच केदार वाघ, पोलीस पाटील नयना नेवसे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नेवसे, ग्रामपंचायत सदस्य गणेश तावरे, अक्षय तावरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गारडे, अरविंद गायकवाड, धनंजय रणदिवे उपस्थित होते.
याचबरोबर मोरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दीपक बोरावके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. प्रतिमापूजनासोबतच स्वच्छता अभियान राबवून दिवंगत अजितदादा पवार यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
To Top