मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

Staryug.live

मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

स्टार युग लाईव्ह :  मोरगाव : 

श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे सर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. पोपटराव तावरे, तसेच सर्व शिक्षक व महिला शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषात दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने दिंडीत सहभाग घेत संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.

यावर्षीच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी होय. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर ग्रंथदिंडीद्वारे वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

दिंडी सोहळ्यात कु. श्रेया दिलीप तावरे हिने विठ्ठल तर कु. तृप्ती संतोष पवार हिने रुक्मिणी यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. त्यांच्या आकर्षक वेशभूषा आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महिला शिक्षिका, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. वारकरी परंपरेतील भक्ती, समता, सेवा, पर्यावरण संरक्षण आणि ज्ञानोपासना या मूल्यांचा
To Top