स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

Staryug.live

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

स्टारयुग लाईव्ह.  :  मोरगाव

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 21 जुलै 2026 रोजी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन वडगाव निंबाळकर–मोरगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणीताई संदीप कदम-ढोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या प्रसंगी बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी आगवणे, पंचायत समितीचे गटनेते बाबा चोरमले, मोरगावच्या सरपंच अलकामाई तावरे, पोपटराव खैरे, केदार वाघ, निलेश केदारी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
मोरगाव परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणारा आणि समाजोपयोगी ठरला.



To Top