राजे उमाजी नाईक स्मारकासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत; जय मल्हार क्रांती संघटनेच्या लढ्याला यश!

Staryug.live

राजे उमाजी नाईक स्मारकासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत; जय मल्हार क्रांती संघटनेच्या लढ्याला यश!

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव 

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.

या समितीवर स्मारकासाठी जागा, आराखडा, अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय बाबी तसेच बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
समितीमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, राजे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज चंद्रकांत सुदाम खोमणे नाईक, प्रदेशाध्यक्ष अंकुशराव रामभाऊ जाधव, ज्येष्ठ सल्लागार समितीचे अध्यक्ष गणपत राघू शितकल आणि माजी युवक अध्यक्ष सुधीर गोविंद नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या स्मारकाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, दौलतनाना शितोळे तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि समाजबांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले.
To Top