राजमाता कल्पना राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील राजे भोसले यांच्या वतीने प्राजक्ता मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.
स्टारयुग लाईव्ह. : मोरगाव
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे प्रतापसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांचे सुपे-पारघना प्रमुख सुनील राजे भोसले यांच्या वतीने सुपे येथील प्राजक्ता मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि हास्य पाहून उपस्थितांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमास जि. प. सदस्य रोहिणीताई कदम, काशिनाथ पिंगळे, जयराम आप्पा सुपेकर, गणेश भुजबळ, आविष्कार कोंडे, ग्रामपंचायत सदस्य सुयश जाधव, महेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाल चांदगुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेम व आपुलकी दिली. सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपत विशेष मुलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत सुनील राजे भोसले यांच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा ठरला.
