श्री मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Staryug.live

श्री मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

स्टारयुग लाईव्ह   :  मोरगाव 

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) एप्रिल २०२६ मध्ये श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या परीक्षेत विद्यालयातील आर्यन कुंडलिक कांबळे याने ३०० पैकी २२० गुण मिळवून ७३.३३ टक्के, तर स्वराली मनोहर तावरे हिने ३०० पैकी २१८ गुण मिळवून ७२.६६ टक्के गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे सौ. विद्या जगताप, सौ. सविता खराटे, श्रीमती विद्या फाळके व श्री. अमोल बोडरे या विषय शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे सर, विभाग प्रमुख श्री. अमोल जगताप, ज्येष्ठ शिक्षक श्री. विजय हाडके, श्री. तुषार माथने, सौ. आम्रपाली गडवे, सौ. योगिनी शेवते, श्री. लालासाहेब आडके व श्री. अमित आवाळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. अशी माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख सौ. सारिका तांबे यांनी दिली.
To Top