जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत सक्षम यादवचे दैदिप्यमान यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

Staryug.live


जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत सक्षम यादवचे दैदिप्यमान यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. 

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे दि. ६ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडलेल्या पुणे जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत सक्षम यादव याने विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेतील ५ किलो गोळा – स्टँडिंग थ्रो प्रकारात सक्षम यादव याने आपल्या दमदार आणि अचूक कामगिरीच्या जोरावर १४.१० मीटर अंतरावर गोळा फेकत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या उत्कृष्ट यशामुळे त्याची आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी डेरवण (जिल्हा रत्नागिरी) येथे निवड झाली असून, विद्यालयासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
सक्षम यादवने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे यांनी सक्षमचे विशेष कौतुक करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री. रमेश शेळके यांनी सक्षमच्या मेहनतीचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला.
विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्षम यादवचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही तो यशाची परंपरा कायम ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सक्षमच्या या यशामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

To Top