मोरगाव चौकात वाहतुकीची होते सातत्याने कोंडी, अपघातांना निमंत्रण .व्यावसायिक जाहिरातीचे फलक, रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्या यामुळे मोरगाव चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असून येथे सातत्याने मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने होत आहे

Staryug.live

मोरगाव चौकात वाहतुकीची होते सातत्याने कोंडी, अपघातांना निमंत्रण 
.व्यावसायिक जाहिरातीचे फलक, रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्या यामुळे मोरगाव चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असून येथे सातत्याने मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने होत आहे

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

बारामती - पुणे रस्ता आणि शिरूर सातारा राज्य महामार्ग दोन्ही रस्ते मोरगाव चौकातून जातात. मुख्य चौकात आवश्यक असलेले वाहतुकीच्या नियमांचे, वाहनांच्या वेगाचे, किलोमीटर अंतराचे आवश्यक फलक येथे नाहीत. 
तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे वाहतूक नियंत्रण कक्ष मुख्य चौकात असणे आवश्यक आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येथे भाविकांची एकीकडे सतत गर्दी असते, तर दुसरीकडे बारामती वरून पुण्याला जाण्याचा मार्ग म्हणून वेगवान सुस्थितीत रस्त्यामुळे या मार्गाचा तर राज्य महामार्ग म्हणून शिरूर सातारा मार्गाचा वापर सातत्यपूर्ण होतो. 
मुख्य चौकात अवजड वाहनांसह इतर वाहने एकावेळी आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते . ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा वादविवादाचे प्रकार वाहन चालकांचे होतात. पोलीस यंत्रणा घटनास्थळी येईपर्यंत स्थानिक नागरिक वाद मिटवून थांबलेली वाहने मार्गस्थ करून वाहतूक सुरळीत करतात. वास्तविक, स्थानिक  व्यावसायिक यांच्या दुकानासमोर रस्त्यावरच गाड्या लावल्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होण्याचे व वादविवादाचे प्रकार सातत्याने होतात.
 मात्र , पोलिस यंत्रणा चोवीस तास उपस्थित नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. मोरगाव बसस्थानक परिसरातही अतिक्रमण आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे अतिक्रमण काढण्यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रस्त्याच्या बाजूने केलेल्या भूमिगत गटारांवर व्यावसायिक यांनी जाहिरात फलक , पार्किंग व दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे.
तर काही किरकोळ दुकाने रस्त्यावर थाटल्यामुळे व गाड्या ही रस्त्यावर लागत असल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.
मोरगाव मधील मुख्य चौकात बारामती - जेजुरी रस्त्यावर दुभाजकाच्या दोन्ही बाजूचे रस्ते रहदारीच्या मानाने अरुंद आहेत. 
मुळात रस्ता पण अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होतात त्यासाठी प्रशासन, ग्रामस्थ, व्यवसायिकांनी वाहतूक कोंडी व गर्दी अपघात होऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या भागातील मोरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोरगाव परिसरातील पाच ते दहा किलोमीटर अंतराच्या आत मधील नागरिक विविध कामांसाठी मुख्य चौकात येतात व गाड्या रस्त्यावर लावून आपापले काम करत राहतात. त्यामुळे रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या मोठ्या, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी जागा कमी मिळते. अनेक वेळा उभ्या असलेल्या गाड्यांना घासून गाड्या निघून जातात. तर अनेक वेळा अपघाताचे प्रकार झाले आहेत. 
मोरगाव मुख्य चौकात गेली तीन वर्षात चार वेळा अपघातात मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत. 
तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मुख्य चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रक आवश्यक आहे. 
मोरगाव चौकामध्ये झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून हितसंबंध असल्यामुळे कोणते विशेष प्रयत्न केले जात नाहीत. तर दुसरीकडे प्रशासनही अतिक्रमण काढण्यासाठी जास्त काही प्रयत्न करत नसल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून येथील चौकात वाहतुकीची कोंडी होत असलेली परिस्थिती कायम आहे.
To Top