आंबी बुद्रुकमध्ये बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी केलेल्या सूर्यफूल प्रात्यक्षिकाला तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली भेट

Staryug.live
आंबी बुद्रुकमध्ये बीबीएफ पेरणी  यंत्राने पेरणी केलेल्या सूर्यफूल प्रात्यक्षिकाला तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली भेट 

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, बीबीएफ पेरणी पद्धत पीक उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर शेती करताना करावा असे आव्हान बारामती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले. 
आंबी बुद्रुक येथे सहा ऑगस्ट 2026 रोजी बीबीएफ पेरणी  यंत्राने पेरणी केलेल्या सूर्यफूल प्रात्यक्षिकाला तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली भेट दिली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
यावेळी हाके यांनी कृषी विभागाच्या सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
सोमनाथ हनुमंत जाधव मौजे आंबी बुद्रुक येथील शेतकरी यांनी सूर्यफुलाचे प्रात्यक्षिक घेतले असून त्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने सूर्यफुलाची लागवड 21जून रोजी केलेली आहे. त्यांनी प्रत्येक बेडवरती दोन लाईन सूर्यफुलाच्या टोकन पद्धतीने घेतलेल्या असून दोन सरीतील अंतर साडेचार फूट ठेवले आहे टोकन पद्धतीने सूर्यफूल केले असल्याने त्यांच्या खर्चात मोठी बचत झालेली असून मशागतीचा किंवा पेरणीचा खर्च वाचलेला आहे तसेच मधल्या  लाईन मधील जागेत त्यांनी तणनाशकाचा वापर करून तंत्र नियंत्रण मिळवले आहे अजून पर्यंत कुठलाही अतिरिक्त खतांचा किंवा औषधांचा खर्च न करता त्यांचे पीक उत्कृष्ट दिसत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा (बी बी एफ) वरती लागवड करावी असे आवाहन  तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. 
यावेळी मंडळ कृषी अधिकारी बापूराव लोदाडे  व सहाय्य कृषी अधिकारी गणेश कदम आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

To Top